Academic year : 2020 -21
Name of the Dept./Associations / Unit : Marathi Department
Name of the activity : online National Poetry Competition – My
Poem on Lockdown Period
Date & Venue of the activity : May 2020
Target group (students / staff) : Students (National level)
Number of the students participated : 30 Students
Name of the staff in-charge : Dr. Shobha Naik
A brief report of the activity :
२२ मार्च २०२० ला देशात अचानक लॉक-डाऊन घोषित झाले आणि आपण त्यातून जाताना अनेक चित्रविचित्र गोष्टी अनुभवू लागलो. प्रचंड उर्जा आपल्यात वागवणारा विद्यार्थी वर्ग असहाय होऊन चार भिंतींमध्ये कोंडून पडला. एकूणच सर्व सार्वजनिक व्यवहार ठप्प झाल्यावर रस्ते शांत होऊन गेले. बातम्यांतून जे कानावर पडू लागले, डोळ्यांना दिसू लागले ते पाहून संवेदनशील मनात काहूर माजू लागले. अशा कोसळलेल्या विदारक परिस्थितीवरील पहिला उद्गार व्यक्त होईल तो कवितेतूनच. हे लक्षात घेऊन सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये वास्तवाचे अवलोकन, आकलन आणि त्याचा आविष्कार ही कौशल्ये आकारास आणण्याच्या दृष्टीतून सहायक अशी स्वरचित काव्य वाचनाची ही स्पर्धा संपन्न झाली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून सदर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चाळीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांनी सध्या जगभर हाहाकार माजविलेल्या रोगराईचे वास्तव कसे लक्षात घेतले आहे, मानवता म्हणजे काय आणि प्रगती म्हणजे काय या संदर्भातून त्यांनी कसा विचार केला आहे याचे दर्शन त्यांनी पाठविलेल्या कवितांमधून घडले.
मराठी व जागतिक साहित्याचे गाढे अभ्यासक व विवेचक श्री अनिल आजगावकर व कलेच्या तसेच आस्वादाच्या क्षेत्रातील नामवंत डॉ. अनिरुद्ध ठुसे (रंगकर्मी, पुणे) यांनी परीक्षकाची भूमिका निभावली. यशस्वी स्पर्धकांना तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना इमेलच्या द्वारे इ-प्रमाणपत्रे पाठविण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे –
प्रथम क्रमांक (रु.१०००/-) – कु. सुनिता लंबोरे, (बी.ए.तृतीय), एम.एम.कला आणि वाणिज्य
महाविद्यालय,खानापूर
द्वितीय क्रमांक (रु. ७५०/-) – कु. प्रणाली सुर्लकर, (एम.ए.), गोवा विद्यापीठ, गोवा
तृतीय क्रमांक (रु.५००/-) – कु. गौरी रत्नपारखी (वाणिज्य II), हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालय,
सोलापूर
उत्तेजनार्थ – १. आलिशा गाड, गोवा विद्यापीठ २. कु. अपूर्वा सांब्रेकर, गोवा विद्यापीठ, ३. कु. स्नेहा तिप्पाणाचे (बी.ए.तृतीय) आरपीडी महाविद्यालय ४. छयन गांवकर, सेंट झेविअर कॉलेज, म्हापसा, गोवा ५. कु. सानिया मुल्ला, व्यंकटराव जुनिअर कॉलेज, इचलकरंजी
